रांगोळी

पूर्व दिशेला सूर्य उगे,
झाली सुंदर सकाळ.
गृहलक्ष्मी! करती काय?
सडासंमार्जन करे अंगणी
त्यावर,
दोन बोटांच्या चिमटीने,
रेखीली रांगोळी.
अनेक बिंदु
जोड़ती रेष
कधी सरळ आणि
वक्र रेष कधी.
फूल-पाणे,
सूर्य-चंद्र कधी
स्वस्तिक आणि
कळश-शंख कधी,
अशी काढ़े
विविध आकार.
लाल-हिरवा
पिवळा- निळा
रंगाचा सुंदर संस्कार.!
अशी सजती
रांगोळी अंगणात
आणि शोभा वाढ़े घराची.
दिवाळी असो
असो किंवा दसरा
संक्रांतीचा
असा दिवस हसरा,
तरी सजती
रांगोळी अंगणात.
गृहसौंदर्याचा प्रतीक
तसाच शुभकार्यचा मान,
मन होई प्रसन्न,
अशी सजती
रांगोळी अंगणात.

-आरती मानेकर

image

28 thoughts on “रांगोळी

    1. पूर्व दिशा में सूरज उगता है
      ऐसे होती सुंदर सुबह
      गृहलक्ष्मी क्या करती है?
      आँगन में पानी डालती,
      उस लिपे हुए आंगन पर
      दो उंगलियों की चुटकी से,
      रंगोली बनाती,
      अनेक बिंदु
      उनको जोड़ती हुई रेखा
      कभी सरल और
      कभी टेढ़ी रेखा
      फूल-पत्ती,
      तो कभी चाँद-सूरज
      स्वस्तिक और
      कलश-शंख कभी
      ऐसे निकालती है
      विविध आकार
      लाल-हरे
      पिला-नीले
      रंगों का सुंदर संस्कार
      ऐसे सजती है
      रंगोली आँगन में
      और घर की शोभा बढ़ती है।
      दिवाली हो
      या हो दशहरा
      उत्तरायण हो
      हो ऐसे शुभ दिन
      तब सजती है
      रंगोली आँगन में।
      गृहसंस्कार का प्रतीक
      ऐसे ही
      शुभकार्यों का मान
      मन प्रसन्न होता है देखकर
      ऐसे सजती है
      रंगोली आँगन में।

      Translated

      Liked by 3 people

Leave a comment